Government Job rules maharashtra. saam tv
Video

Government Job Rule : सरकारी नोकरभरती प्रक्रियेत मोठा बदल, सरकारनं नेमका काय निर्णय घेतला? जाणून घ्या!

maharashtra government changes recruitment rules : राज्य मंत्रिमंडळानं सरकारी भरती प्रक्रियेच्या नियमांत मोठा बदल केला आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी सरकारच्या दिलेल्या सवलतींचा लाभ घेतला असेल तर, त्यांची नियुक्ती राखीव प्रवर्गातच होईल. त्यांना खुल्या प्रवर्गातील पदांवर दावा सांगता येणार नाही.

Nandkumar Joshi

स्पर्धा परीक्षांमध्ये वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परिक्षेस बसण्याची संधी या आधारे सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या नियुक्तीबाबतच्या धोरणाला आज, गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिलीय. या निर्णयामुळे गुणवत्तेच्या आधारे खुल्या प्रवर्गात निवड होणाऱ्या उमेदवारांबाबत स्पष्टता निर्माण होणार आहे. आरक्षणाच्या अंमलबजावणीत अधिक पारदर्शकता आणि सुसंगती येणार असल्याचे बोलले जाते.

निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेस बसण्याची संधी (परीक्षा शुल्क ही बाब वगळून) या पात्रतेच्या निकषांमध्ये राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी कोणतीही सवलत घेतलेली नाही, अशा उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारे खुल्या प्रवर्गातूनही करण्यात येणार आहे. तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव , परीक्षेस बसण्याची संधी (परीक्षा शुल्क ही बाब वगळून) संधीमध्ये सरकारच्या सवलतींचा लाभ घेतला असेल तर अशा उमेदवारांची गणना संबंधित राखीव प्रवर्गातच करण्यात येईल. अशा उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील पदांवर दावा करता येणार नाही, असं या धोरणात स्पष्ट करण्यात आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG: रोहितचे शतक व्यर्थ; अवघ्या ८ चेंडूंमध्ये सामन्याचा निकाल बदलला; आठ वर्षांनंतर इंग्लंडनं मालिका जिंकली

प्रशासकीय सेवेत मोठे फेरबदल! IAS अधिकारी अन् तहसीलदारांच्या बदल्या; कोणाची कुठे झाली नियुक्ती?

लॉर्ड्सवर हिटमॅनचे वादळ! इंग्लंडविरुद्ध रोहित शर्माचे वादळी शतक, असा पराक्रम करणारा पहिला भारतीय

अंत्यविधीवरून परतताना मोठी दुर्घटना! 40 जणांना घेऊन जाणारी नाव पलटली

Daily Horoscope : ५ राशींवर भोलेनाथांची कृपा! प्रचंड पैसा मिळणार अन् मोठे यश; वाचा सोमवारचे राशिभविष्य

SCROLL FOR NEXT