स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी महत्वाचं विधान केलं आहे. नाशिकमध्ये आढावा बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. saam tv
Video

मुख्यमंत्री फडणवीसांचं निवडणुकांबाबत मोठं वक्तव्य; महायुतीच्या निर्णयावर स्पष्ट भूमिका, VIDEO

Mahapalika Elections : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीच्या संदर्भात महत्वाचं विधान केलं आहे.

Nandkumar Joshi

आगामी काळात महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. सत्ताधारी महायुतीतील घटकपक्ष आणि विरोधी पक्षांनीही तयारी सुरू केली आहे. अनेक ठिकाणी पक्षप्रवेश सोहळे होत आहेत. तर प्रमुख राजकीय पक्षांनी जिल्हानिहाय आढावा बैठका सुरू केल्या आहेत. नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकांनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महायुतीबाबत मोठे विधान केले आहे.

काय म्हणाले फडणवीस?

नाशिक विभागात उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेतला. महापालिका, जिल्हा परिषदा आणि नगरपालिका, नगरपंचायती आहेत, तेथील कार्यकर्त्याचं म्हणणं ऐकून घेतलं आहे. त्यांना मार्गदर्शन केलं आहे. मागील वेळी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगलं यश मिळालं होतं. यावेळीही चांगलं यश मिळेल अशी अपेक्षा आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

आम्ही पहिल्या दिवसापासून महायुतीच्या तिन्ही पक्षांनी ठरवलं आहे, जिथं जिथं शक्य आहे, तिथं महायुती करणार आहोत. जिथे आम्ही तुल्यबळ आहोत, तिथे आम्ही मैत्रीपूर्ण लढत करू, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Pune Expressway Missing Link: मुंबई- पुणे कनेक्टिव्हिटी बिघडली; एक्सप्रेसवेवर कोंडी नियोजनचं 'मिसिंग'

LPG Cylinder: महागाईच्या झळा, सामान्यांना 'कळा'! व्यावसायिक सिलेंडर 993 रुपयांनी महागला; खाद्यपदार्थांच्या किंमती वाढणार?

Pune Crime: गुरांच्या गोठ्यात ४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, लैंगिक अत्याचारानंतर चिमुरडीची हत्या

Mumbai Pune Missing Link : 'मिसिंग लिंक'ला विरोध; लोणावळ्यातून प्रवेश देण्याची मनसेची मागणी

Ladki Bahin Yojana: राज्यातील १ कोटी ८९ लाख लाडक्या बहिणी पात्र; ५४ लाख बहिणींना नाही मिळणार १५०० रुपये

SCROLL FOR NEXT