Dhananjay Munde resignation Saam Tv
Video

Maharashtra Politics: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर मंत्रिपदावर वर्णी कुणाची? ही ४ नावं चर्चेत

Dhananjay Munde resignation: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षातील काही आमदारांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी लावून धरली होती.

Omkar Sonawane

काल रात्री संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आले. हे फोटो पाहिल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली.

आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खाते होते. त्यामुळे मंत्रिमंडळात एक जागा रिक्त झाली असून, हे मंत्रिपद कोणाला मिळणार याबाबत चर्चेला उधाण आले आहे.

राज्यात दुसऱ्यांदा महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर काही माजी मंत्र्यांना डच्चू देण्यात आला होता. त्यामध्ये ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, अनिल पाटील, संजय बनसोडे आणि प्रकाश सोळंखे यांचा समावेश होता. मात्र, मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ कमालीचे नाराज होते. त्यांनी ही नाराजी उघडपणे व्यक्तदेखील केली होती. भुजबळ यांनी अनेक वर्षे अन्न व नागरी पुरवठा खाते सांभाळले आहे. त्यामुळे हे खातं पुन्हा त्यांच्या ताब्यात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या मंत्रिपदावर कुणाची वर्णी लागणार, याबाबत कमालीची उत्सुकता लागलेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT