परळी मतदारसंघात मतदान केंद्राची तोडफोड करण्यात आली आहे. याप्रकरणाची चौकशी आता पोलिसांकडून करण्यात आली आहे. ही तोडफोड कोणी केली याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परळीतील घाटनांदूर येथे ईव्हीएम मशीनची तोडफोड करण्यात आली आहे. या ठिकाणच्या मतदारकेंद्रावर तोडफोड करण्यात आली आहे. यात ईव्हीएम मशीनची देखील तोडफोड झाली आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत रंगत आहे. त्यातच मतदानाच्या दिवशी झालेल्या या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. ही तोडफोड कोणी केली, असे करताना तोडफोड करणाऱ्यांना कोणी पहिलं नाही का, परिसरात सिसिटीव्ही नव्हते का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत.
Edited By Rakhi Rajput
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.