Hingoli News SaamTv
Video

Hingoli News : आचारसंहितेत पैशांचा पाऊस! हिंगोलीत कोटींची रोकड जप्त

Maharashtra Assembly election : आचारसंहितेच्या काळात नाकाबंदी दरम्यान राज्यात विविध शहरात मोठ्या प्रमाणात पैसे मिळून येत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या मैदानात पैशांचा पाऊस पडत आहे. आज हिंगोलीत देखील निवडणूक आयोगाकडून कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे.

Saam Tv

हिंगोलीमध्ये एक कोटींहून अधिक रोकड जप्त करण्यात आली आहे. हिंगोली पोलीस आणि निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केलेली आहे. विधानसभा निवडणूक 2 दिवसांवर येऊन ठेपलेली असताना एवढ्या मोठ्याप्रमाणात रोकड मिळाल्याने हिंगोली परिसरात खळबळ उडाली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या मैदानात राज्यात विविध शहरात पैशांचा पाऊस होताना दिसत आहे. त्यातच आता निवडणुक अंतिम टप्प्यात आलेली असताना हिंगोलीत निवडणूक आयोगाने एक कोटीपेक्षा जास्त रोकड जप्त केली आहे. पोलीसांच्या नाकाबंदी दरम्यान एका ट्रॅव्हलमधून ही सर्व रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही रक्कम कुठून आली, ट्रॅव्हलमधून ती कुठे नेण्यात येत होती, याचा काही राजकीय संबंध आहे का याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. आचारसंहितेच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड मिळून आल्याने याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहेत.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ट्रेकिंग करताना पक्षाघात, पण ८४ वर्षीय करवंदे काका हरले नाहीत; १७०६ वेळा सर केला सिंहगड किल्ला!

Snake Hidden Inside Scooter: अरे बापरे बाप! स्कुटीला स्टार्टर मारणार तोच फुसफुसला, हेडलाइटमध्ये लपला होता विषारी साप, VIDEO

Maharashtra Live News Update : उदयनराजे-जयकुमार गोरे यांच्यात मिश्कील दिलजमाई

Veg Biryani Recipe : स्ट्रीट स्टाइल चटपटीत व्हेज बिर्याणी, एकदा खाल तर खातच रहाल

Accident : ऐन सणासुदीत ८ जणांचा अपघाती मृत्यू, पिकअप 100 फुटावरून कोसळला; चांदसैली अपघाताचा ग्राउंड रिपोर्ट समोर

SCROLL FOR NEXT