Mahalakshmi Express Robbery Saam TV
Video

Mahalakshmi Express : मध्यरात्री थरार! महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये दरोडा; महिलांचे सोन्याचे दागिने लुटले

Mahalakshmi Express Robbery : मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये मध्यरात्री दरोड्याची घटना घडली. साताऱ्यातील लोणंद ते सालपे स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड करून रेल्वे थांबवल्याचा आरोप आहे.

Namdeo Kumbhar

थेट सिग्नल यंत्रणाच बिघडवून महालक्ष्मी एक्स्प्रेस लुटलीय. महिलांचे 2लाखांचे दागिने लंपास केलेयत. मुंबईहून कोल्हापूरकडे जाताना लूट केलीय. सातारा जिल्ह्यातल्या सालपे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड करून रेल्वे थांबवली. त्यानंतर 5 ते 6 दरोडेखोरांनी 3 महिला प्रवाशांच्या गळ्यातले सोन्याचे दागिने हिसकावून नेले.3सुरक्षा कर्मचारी असतानाही लूट केल्यानं, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय.

मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये सिग्नल यंत्रणेत बिघाड करून रेल्वे थांबवत महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सातारा जिल्ह्यातील लोणंद ते सालपा स्थानकांदरम्यान मध्यरात्री अडीचच्या सुमारास हा प्रकार घडला. दोन महिला प्रवाशांचे सोन्याचे दागिने हिसकावून चोरटे पसार झाले. विशेष म्हणजे, याच रेल्वे मार्गावर वर्षभरात तिसऱ्यांदा अशा प्रकारची घटना घडल्याने रेल्वे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याप्रकरणी लोणंद रेल्वे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विरोधकांच्या खोट्या नरेटिव्हला उत्तर देण्यासाठी भाजपचे आज पासून जनजागरण अभियान

गरोदरपणानंतर स्त्रियांचे वजन का वाढते? यामागचे कारण काय?

Monday Horoscope: डोकं शांत ठेवा! पैशांच्या अडचणी कमी होतील; वाचा आजचे राशीभविष्य

धमकीनंतरही बिग बींचा रविवारचा नियम कायम; चाहत्यांना भेटण्यासाठी शोधली भन्नाट शक्कल

Vastu Tips For Wall Clock: घरात घड्याळ कुठे लावावे? वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा कोणती?

SCROLL FOR NEXT