Sangli Lok Sabha  Saam TV News
Video

Sangli Lok Sabha News: मविआचं सांगलीत काय होणार? ठाकरे गट लढण्यावर ठाम, काँग्रेसचीही मोठी प्रतिक्रिया समोर

Lok Sabha Election 2024 News Today: सांगलीचा उमेदवार मागे घेणार नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय. तर दुसरीकडे सांगलीची जागा सुरुवातीपासून काँग्रेसचीच होती, असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलंय.

Saam TV News

सांगली : सांगलीतून ठाकरे गटाने उमेदवार दिल्यानं महाविकास आघाडीच सर्व काही आलबेल नाही, हे अधोरेखित झालंय. तर दुसरीकडे काँग्रेसही सांगलीतून उमेदवार देण्यावर ठाम असल्याचं दिसतंय. अशातच संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांच्या महत्त्वाच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडीमधील सांगलीतला तणाव पाहता, संजय राऊत सांगलीचा दौरा करणार आहेत. सांगलीतली मविआची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न राऊतांच्या दौऱ्यात होतो का, हे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान, सांगलीचा उमेदवार मागे घेणार नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय. तर दुसरीकडे सांगलीची जागा सुरुवातीपासून काँग्रेसचीच होती, असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलंय. त्यामुळे सांगलीत महाविकास आघाडीचं नेमकं काय होतं? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. एकूणच सांगलीच्या जागेवरुन महाविकास आघाडीमध्येच अंतर्गत रस्सीखेच सुरु असल्याचं ठळकपणे अधोरेखित झालंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चीनमुळे नेपाळमध्ये महाप्रलय? 300 जणांचा मृत्यू, शेकडो भारतीय बेपत्ता

Facebook, INSTA वर दररोज 6 तासांची बंदी; 18 वर्षांखालील मुलांसाठी कडक नियम

Punjab Politics: भाजप आणि शिरोमणी अकाली दलाची युती होणार की तुटणार? दोन्ही पक्षातील नेमका तिढा काय?

खाऊन पिऊन आंदोलन करा, झिरवाळांचा आदिवासी आंदोलकांना अजब सल्ला

Farmer Success Story : वावरची पॉवर! शेतकरी महिलेची भरारी; शेतीतून लाखोंची कमाई, यशाची त्रिसूत्री, प्रवास वाचून थक्क व्हाल!

SCROLL FOR NEXT