Maharashtra local body election revised schedule saam tv
Video

Local Body Election : नगर परिषद, नगरपंचायत प्रचाराचा आज शेवटचा दिवस, रात्री १० वाजता तोफा थंडावणार

Maharashtra Municipal Polls: महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा आज रात्री १० वाजता शेवट होणार आहे. उद्या सकाळी ७:३० वाजता मतदानाला सुरुवात होईल. ३ डिसेंबरला मतमोजणीनंतर निकाल जाहीर केले जातील.

Namdeo Kumbhar

Nagar Parishad and Nagar Panchayat : राज्यातल्या नगर परिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची आज रात्री १० वाजता सांगता होत आहे. उद्या सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. ३ डिसेंबर रोजी मतमोजणीनंतर निकाल जाहीर केले जातील. अपक्ष उमेदवारांना प्रचारासाठी कमी वेळ मिळाल्याने मुदत वाढवून देण्यात आली होती, अशी माहिती समोर आली आहे. आज रात्री १० वाजेपर्यंत उमेदवारांना प्रचार करता येणार असून, त्यानंतर प्रचार तोफा थंडावतील.

महायुतीच्या आज पुण्यात सभांचा धडाका -

पुणे जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सभा होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भोरमध्ये सभा तर एकनाथ शिंदे यांची चाकण आणि जुन्नर येथे सभा होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर,चाकण,आळंदी येथे सभा होईल.पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती होत आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यातच आता पुण्यात फडणवीस,शिंदे आणि पवार यांच्या सभा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप खासदारांना कार्यक्रमातच चक्कर, तातडीने रुग्णालयात दाखल; माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्ष भेटीसाठी हॉस्पिटलमध्ये

Kidney : किडनी निकामी होण्याआधी सकाळी दिसतात ही ४ लक्षणं, दुर्लक्ष करू नका अन्यथा...

समृद्धी महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात, मुंबईला जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ५ जणांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चंद्रपूरच्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

LPG Connection: LPG ग्राहकांसाठी महत्वाची बातमी, ३० जूननंतर कट होणार गॅस कनेक्शन; आजच करा हे काम

SCROLL FOR NEXT