Forest officials successfully capture the leopard hiding near the Vithewadi sugar factory in Devla, Nashik. Saam Tv
Video

नाशिकच्या देवळा परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद|VIDEO

Leopard Terrorizing Devla In Nashik Finally: नाशिकच्या देवळा तालुक्यात विठेवाडी परिसरात दहशत माजवणाऱ्या बिबट्याला अखेर वनविभागाने जेरबंद केले. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला असून गेल्या काही महिन्यांपासून वाढलेल्या बिबट्यांच्या हालचालींमुळे नागरिकांत भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Omkar Sonawane

नाशिकच्या देवळा तालुक्यातील विठेवाडी परिसरात धुमाकूळ घालणा-या बिबट्याला जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले आहे. विठेवाडी साखर कारखाना परिसरात हा बिबट्या लपलेला असतांना कारखान्याच्या सुरक्षा रक्षकाला तो दिसताच त्यानं वनविभागाला याची माहिती दिल्यानंतर पिंजरा लावण्यात आला. त्यात बिबट्या जेरबंद झाल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. संपूर्ण राज्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांनी हैदोस घातला आहे. नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झालेय. नाशिकमध्ये देखील बिबट्यांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. शहरासह ग्रामीण भागात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. शेकडोंचे प्राण बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये गेले असून प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करावी अशी मागणी भयग्रस्त नागरिक करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar : मित्रच निघाला चोर! व्यापाराच्या दुकानात बसायचा, संधी साधून पैसे खिशात टाकायचा, धक्कादायक प्रकार उघड

अक्षय खन्ना अजूनही सिंगल; पण कपूर खानदानच्या 'या' अभिनेत्रीशी ठरणार होतं लग्न, मोडलं कसं?

Peanut Butter : केस गळती वाढलीये? मग करा हा उपाय

Mira Jagannath Bold Photsos: ऑफशोल्डर ड्रेस अन् बोल्ड अदा, मीराचे फोटो पाहून पोरं झाली फिदा

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांनी कर्ज फेडलं नाही, तर बंद होणार पीएम किसानचे ₹६०००?वाचा नियम काय सांगतो

SCROLL FOR NEXT