Leh-Ladakh Earthquake: 5.5 Magnitude Tremors Felt Early Morning Saam Tv
Video

Earthquake News : लेह-लडाखला भूकंपाचा जोरदार धक्का; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Leh-Ladakh Earthquake : लेह आणि लडाख परिसरात सकाळी ६.०५ वाजता ५.५ तीव्रतेचा भूकंप झाला. जोरदार धक्क्यांनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सुदैवाने जीवितहानीची माहिती नाही.

Alisha Khedekar

लेह आणि लडाख परिसर आज सकाळी भूकंपाच्या धक्क्याने हादरला. सकाळी सुमारे ६ वाजून ५ मिनिटांनी या भागात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.५ इतकी नोंदवण्यात आली आहे. अचानक जाणवलेल्या या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. भूकंपाचे धक्के जाणवताच अनेक नागरिक घराबाहेर पडले. काही ठिकाणी नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पाहायला मिळाले. मात्र, सुदैवाने या भूकंपामुळे आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. भूकंपानंतर कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले आहे का, याची माहिती घेतली जात आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT