Ladki Bahin Yojna SaamTv
Video

Video : 'लाडकी बहीण'वरून मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांना नोटिस, पाहा काय आहे प्रकरण

Saam Tv

लाडकी बहीण योजनेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अर्थमंत्री अजित पवार यांना कायदेशीर नोटिस बजावण्यात आली आहे. ही योजना रोजगार मिळवून न देता भिकारी जीवन जगण्याची सवय लावणारी आहे, असा आरोप या नोटिसमधून करण्यात आला आहे. राजकीय विश्लेषक विनय हर्डीकर यांनी वकील असीम सरोदे यांच्यामार्फत ही नोटिस पाठवली आहे. राज्याचे मुख्य सचिव आणि महिला बाल विकास मंत्रालयालाही ही नोटिस पाठवण्यात आली आहे.

निवडणुका डोळ्या समोर ठेवून राजकीय लाभ मिळावा म्हणून लाडकी बहीण योजना आणली गेली आहे असा आरोप राजकीय विश्लेषक विनय हर्डीकर यांनी या नोटिसमधून केला आहे. तसेच ही योजना राजकीय फायद्यासाठी आणली गेली आहे, असं म्हणत या नोटिसच्या माध्यमातून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. अॅड. असीम सरोदे यांच्या मार्फत थेट राज्य सरकारलाच नोटीस पाठवत दिड हजार रूपयात महिलांचे आर्थिक स्वातंत्र्या, पोषण, आरोग्य कसे काय सुधारणार अशी विचारणा केली आहे. आता या नोटीसला सरकार काय उत्तर देते हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral News : वाढीव बिलामुळे नगरसेविका भडकली; काठी घेऊन वीज वितरण कार्यालयात अधिकाऱ्यांवर खेकसली, VIDEO

Indapur Politics: इंदापुरात बंडाचा झेंडा! हर्षवर्धन पाटलांच्या उमेदवारीवरुन शरद पवारांना इशारा; परिवर्तन मेळाव्यात काय ठरलं?

Dussehra Leaves: दसऱ्याला सोनं म्हणून आपट्याची पाने का वाटतात? कारण वाचा

Dhule Corporation : ठाकरे गटाकडून रावणाची प्रतिकृती जाळून निषेध; विकास निधीत भाजपकडून भ्रष्टाचार केल्याचा आरोप

Elephant Age: हत्ती किती वर्ष जगतात?

SCROLL FOR NEXT