लातूरमध्ये कुरिअर नेणाऱ्या टेम्पोत स्फोट झाला. यात एक जण गंभीर जखमी झाला आहे.  saam TV
Video

लातूरमध्ये कुरिअरच्या टेम्पोत भीषण स्फोट, भररस्त्यातील घटनेने सगळेच हादरले, VIDEO

Latur Tempo Blast Video : लातूरमध्ये कुरिअर घेऊन आलेल्या टेम्पोमध्ये भीषण स्फोट झाला. त्यात एक जण गंभीर जखमी झालाय. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Nandkumar Joshi

संदीप भोसले, लातूर | साम टीव्ही

लातूरमधील उमाटे कुरिअरच्या ठिकाणी कुरिअर घेऊन आलेल्या एका टेम्पोमध्ये मोठा स्फोट झाला. यात एक व्यक्ती गंभीर जखमी झालीय. स्फोटाची तीव्रता पाहून घटनास्थळी तात्काळ फॉरेन्सिक पथक आणि दहशतवादी विरोधी पथक दाखल झाले. पोलीस प्रशासनाकडून या स्फोटाचं नेमकं कारण शोधण्याचं काम युद्धपातळीवर सुरू झालंय.

स्फोटात जखमी झालेल्या व्यक्तीवर उपचार सुरू आहेत. घटनास्थळी बॉम्ब शोधक पथक, फॉरेन्सिक लॅब, दहशतवादविरोधी पथक, स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. एअरगनसाठी वापरण्यात येणाऱ्या कार्टिजिसमधील गॅसमुळे हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांची वेगवेगळी पथके याचा शोध घेत आहेत, अशी माहिती लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Train Facts : रेल्वेच्या ट्रेन क्रमांकात दडलाय खास कोड! प्रत्येक अंक सांगतो गाडीची माहिती

जरा डोकं चालवा आणि सांगा! या फोटोमध्ये किती घोडे आहेत?

दोन दिवसांत दोन धक्के! माजी आंतरराष्ट्रीय धावपटूचा भाजपला रामराम, प्रदेशाध्यक्षांकडे सोपवला राजीनामा

Vastu Tips : घरातील 'या' पाच ठिकाणी रिकामी भांडी ठेवू नका, नाहीतर येईल नशिबी येईल दारिद्र्य

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये कार-कंटेनरचा भीषण अपघात

SCROLL FOR NEXT