Video

Viral Video : लालबाग राजाच्या चरणी भेदभाव; मंडपात काहींना व्हीआयपी दर्शन, तर सर्वसामान्यांशी मुजोरी, पाहा व्हिडिओ

lalbaugcha raja viral video : लालबाग राजाच्या मंडपातून धक्कादायक घटना समोर आली आहे. या मंडपात सुरक्षारक्षकांनी सर्वसामान्य भक्तांसोबत मुजोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Vishal Gangurde

मुंबई :

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील गणेश मंडळ असलेल्या लालबागचा राजाच्या मंडपात भाविकांची रीघ लागली आहे. हजारो लोकांची राजाच्या चरणी लीन होण्यासाठी तासंतास रांगेत उभे राहत आहेत. याच लालबागच्या राजा मंडपातील भेदभाव आणि मुजोरीपणा पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. या मुजोरीपणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

लालबाग राजाच्या मंडपात काही जण आरामशीर दर्शन घेत आहेत. तर दुसऱ्या बाजूला सुरक्षारक्षकाकडून सर्वसामान्य भक्तांसोबत मुजोरपणा सुरु आहे. या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ दोन-तीन दिवसांपूर्वीचा असल्याचा सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा मुजोरीपणा कधी संपणार, असा सवाल उपस्थित आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये एक कुटुंब फोटो काढत आहेत. तर दुसऱ्या बाजूला सुरक्षारक्षक सर्वसामान्य महिला आणि पुरुष भक्तांसोबत मुजोरीपणा करत आहेत. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लालबाग राजा गणेशोत्सव मंडळाकडून कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : खुशखबर! दसरा-दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹२,००० येणार, महत्त्वाची अपडेट समोर

Mumbai Accident: मुंबईत एकाच रात्री दोन भयानक अपघात; रस्ता ओलांडताना तरुणीचा मृत्यू, डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा करूण अंत

दारूची बाटली, भरलेले पेग अन्...; शवविच्छेदन विभागात रंगली दारू पार्टी; पुण्यातील YCM रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Maharashtra News Live Update: विजय संकल्प मेळाव्यातून किरण सरनाईक यांच्या विजयाचा निर्धार

CJP Protest: 'सेंट्रल पार्कमध्ये तिरंगा फडकवता येणार पण...' दिल्ली पोलिसांची CJP समोर ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT