Ladki Bahin Yojna Scheme Saam tv
Video

Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजणेमुळे सरकारी तिजोरीवर ताण? जिल्हा नियोजनासाठी अपुरा निधी, कंत्राटदारांची बिलं थकीत

Financial Burden Of Ladki Bahin Yojna Scheme: लाडकी बहीण योजणेमुळे सरकारी तिजोरीत खडखडाट झाल्याची माहिती अर्थ विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.

Saam Tv

लोकसभा निवडणुकीत महायुतीला हव तितके यश प्राप्त न झाल्यामुळे विधानसभा निवणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात 'लाडकी बहीण योजना' लागू केली. यामध्ये राज्यातील महिलांच्या खात्यात थेट पंधराशे रुपये जमायला सुरुवात झाली. या योजनेमुळेच महायुतीने विधानसभेवर झेंडा फडकवला.असे अनेक नेत्यांनी बोलूनही दाखवले. आता याच योजेनचा परिणाम हा सरकारी तिजोरीवर झाला आहे. कारण जिल्हा नियोजनासाठी अपुरा निधी मिळत आहे, आर्थिक वर्ष संपत आले तरी देखील आता पर्यंत फक्त 60 टक्केच निधी राज्यातील जिल्हा नियोजन समितीला मिळाला आहे. तर राज्यातील कंत्राटदारांची कोट्यावधी रुपयांची बिल थकीत असल्याचे अर्थ खात्यातील सूत्रांनी सांगितले आहे. तर राज्यातील इतर योजनांनाही कात्री लागली असल्याचे बोलले जात आहे.

आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सरकार लाडकी बहीण योजनेची रक्कम दरमहा 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याची तयारीही करत आहे. काही दिवसपूर्वीच कृषिमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले होते की, लाडकी बहीण योजणेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण पडत असून शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेवर परिणाम होतोय. या योजनेमुळे राज्याला दरवर्षी 46,000 कोटी रुपयांचा अधिकचा खर्च येईल असा अंदाज वर्तवला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! हे आयडी लगेचच तयार करा, अन्यथा पीएम किसान योजनेचा हप्ता विसरा

Chhattisgarh : ३६ किल्ल्यांची भूमी छत्तीसगड! भारतात लपलेला ऐतिहासिक खजिना, तुम्ही कोण-कोणते किल्ले पाहिलात?

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये रिंगरोड बाधित शेतकऱ्यांचे भाजप कार्यालयावर आंदोलन

Good News : LPG दरात झाली मोठी घट, ऑटो चालकांना मोठा दिलासा, पाहा आता किती रूपयांना मिळणार?

पांढरे केस होतील काळे! तुरटी आणि आवळ्याचा 'हा' सोपा उपाय ठरेल फायदेशीर

SCROLL FOR NEXT