राज्य सरकारच्या 'लाडकी बहीण' योजनेबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी SIT चौकशीची मागणी केली आहे. योजनेच्या अंमलबजावणी आणि लाभार्थ्यांच्या निवडीबाबत प्रश्न उपस्थित करत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली.
लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात कॅगने ताशेरे ओढले आहेत. अनेक विभागांचा खर्च ५० टक्क्यांपर्यंत कमी झालेला आहे. लाडकी बहीण योजनेवर आतापर्यंत अतिरिक्त खर्च झाला आहे, असे कॅगने अहवालात म्हटले आहे. यावर विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. या योजनेचा लाभ पुरुषांनी कसा घेतला? ते कुठून आले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एसआयटी चौकशी व्हायला हवी, अशी मागणी देखील त्यांनी केली. खरेतर ऑडिट केले पाहिजे. एसआयटी चौकशी करावी. त्यात इतके सरकारी लोक आले कसे? इतके लाभ घेणारे पुरुष कसे आले? लाडकी बहीण योजना आहे त्यात भाऊ गेला कसा? हा प्रश्नच आहे ना...असे त्या म्हणाल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.