Ladki Bahin Yojana SAAM TV
Video

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची जानेवारीत संक्रात गोड होणार? डिसेंबरची 'ओवाळणी' कधी मिळणार? VIDEO

Ladki Bahin Yojana update : लाडक्या बहिणीला डिसेंबरचा हप्ता शेवटच्या आठवड्यात मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र सरकारनं याबाबत कोणत्याही हालचाली केलेल्या नसल्यामुळे आता हा हप्ता नव्या वर्षातच मिळणार की काय असा प्रश्न निर्माण झालाय. नव्या वर्षात लाडकीची संक्रांत गोड होणार का? आणि दोन्ही हप्ते एकत्रच मिळणार का यावरचा हा विशेष रिपोर्ट...

Saam Tv

राज्यातील गरीब महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली. योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये देण्याचे जाहीर केले. या योजनेंतर्गत नोव्हेंबरपर्यंतची रक्कम मिळाली आहे. त्यामुळे डिसेंबरच्या हफ्त्याची सर्वांनाच प्रतिक्षा आहे. हिवाळी अधिवेशनानंतर डिसेंबरची रक्कम दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या सुरूवातीला जाहीर केले होते. मात्र डिसेंबर महिना संपत आला, तरी बहिणींना अद्याप ‘ओवाळणी’ मिळालेली नाही. त्यामुळे सरकारच्या निर्णयाकडे ‘बहिणीं’चे लक्ष लागले आहे.1500 रुपयांचा हप्ता जमा होण्यासाठी आणखी काही दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. डिसेंबरच्या हप्त्याबाबत मुख्यमंत्री काय म्हणाले होते ते पाहूय़ात..

आत्तापर्यंत या योजनेत काय झालं ते पाहूया...

जुलै ते नोव्हेंबरपर्यंतचे साडेसात हजार रुपये सरकारने ‘बहिणीं’च्या खात्यात दिवाळीपूर्वीच जमा केले जाईल असं सांगण्यात आलं आहे.. दरम्यान, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली. त्यामुळे राज्य सरकारने 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत दिली होती. आचारसंहिता संपल्यानंतर प्रलंबित अर्जांची छाननी सुरू करण्यात आली. त्यानंतर त्रुटीयुक्त अर्ज बाद करण्यात आले.निकष पूर्ण न करणारे पुणे, पिंपरीसह राज्यातील अनेक ठिकाणी हजारो अर्ज बाद झाले आहेत. मंजूर अर्जदारांचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडण्यात आले.

योजनेचे निकष बदलणार नाहीत असं सरकारनं जाहीर केलं आहे.

महायुतीने विधानसभा निवडणुकीत घोषणा केल्यानुसार दरमहा रक्कम 1500 रुपयांवरून 2100 करण्यात येणार आहे. त्याकडेही ‘बहिणीं’चे लक्ष लागले आहे.

तर डिसेंबरचा हप्ता नवीन वर्षातच मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारनं डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र दिला तर लाडक्या बहिणींची संक्रांत आणखीनच गोड होणार यात शंका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT