hasan mushrif saam tv
Video

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार, पण... हे काय बोलून गेले फडणवीस सरकारचे मंत्री? VIDEO

Hasan Mushrif: लाडक्या बहीणींना 2100 रुपये दिल्याशिवाय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आम्हाला मते मिळणार नाहीत असे अचंबित करणार विधान मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.

Omkar Sonawane

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू केली. या योजनेंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये मिळू लागले. निवडणूक प्रचारातही महायुतीने हाच मुद्दा घेत मते मागितली. राज्यातील मतदारांनीही महायुतीच्या झोळीत भरभरून मते दिली. याच जोरावर सत्ताही मिळाली. सत्ता आल्यानंतर महिलांना २१०० रुपये देऊ, असं आश्वासन दिलं होतं. पण हे आश्वासन अद्याप पूर्ण केलेलं नाही. २१०० रुपये कधी मिळणार, याकडं महिलावर्गाचं लक्ष लागलंय. तर दुसरीकडं २१०० रुपये नाहीच, पण ही योजना गुंडाळण्यात येईल, अशी टीका विरोधकांनी सुरू केली आहे. यावर वेळोवेळी राज्य सरकारच्या प्रतिनिधींनी उत्तर देत ही योजना सुरूच राहील असं छातीठोकपणे सांगितलं. आता राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. पण त्यांच्या विधानानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

२१०० रुपये देण्याचं आम्ही वचन दिलं आहे. अनेक प्रकारच्या बातम्या येत आहेत. नमो सन्मान योजनेचा ज्या महिला लाभार्थी आहेत, त्यांना पाचशेच रुपये मिळणार आहेत, अशी जोरदार चर्चाही सुरू झाली आहे. मविआचे नेतेही तेच म्हणत आहेत. मी तुम्हाला युती सरकारचा मंत्री म्हणून सांगतो, योग्यवेळी लाडक्या बहिणींच्या खात्यात २१०० रुपये येतील, असं मुश्रीफ यांनी सांगितलं. पण त्याचवेळी मुश्रीफ यांनी अजब विधान केलं. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आम्हाला त्याशिवाय मते मिळणार नाहीत हे आम्हाला माहीत आहे, असे ते म्हणाले. आता याच विधानामुळं विरोधकांच्या हातात आयतं कोलीत मिळालं आहे, असं बोललं जात आहे. आता यावर विरोधकांकडून काय प्रतिक्रिया येतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तानंतर ASI अधिकाऱ्याचा मृत्यू; महाराष्ट्र पोलिस दलात शोककळा

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

SCROLL FOR NEXT