Kunal Kamra and eknath Shinde. saam tv
Video

Kunal Kamra Controversy : कुणाल कामराला महाराष्ट्रात येऊ द्या, त्याची मस्ती उतरवू; शिंदेंच्या आमदाराची वॉर्निंग

Shivsena MLA Warns Kunal Kamra : एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर करून वाद ओढवून घेणाऱ्या स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराविरोधात शिवसैनिकांचा संताप कायम आहे. कुणाल कामराची मस्ती उतरवू, असा इशारा आता शिवसेना आमदारानं दिलाय.

Nandkumar Joshi

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यानं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबन गीत सादर केलं. त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. ज्या ठिकाणी कुणाल कामराचा शो झाला, त्या स्टुडिओची तोडफोड केली. राज्यभरात ठिकठिकाणी शिवसैनिकांनी कामराविरोधात आंदोलन केलं. पण माफी मागणार नाही असं कामरा म्हणाला. याच कुणाल कामराला आता शिवसेनेच्या आमदारानं इशारा दिला आहे. कामराला महाराष्ट्रात पाय ठेवू द्या, त्याची मस्ती उतरवू, असा इशारा आमदार संजय गायकवाड यांनी दिला आहे.

मी माफी मागणार नाही, पण चौकशीला सहकार्य करणार असं कुणाल कामरा म्हणाला. त्यावर आता आमदार संजय गायकवाड यांनी त्याला इशारा दिला आहे. कामराला महाराष्ट्रात येऊ द्या. शिवसैनिक त्याचा माज आणि मस्ती उतरवतील. काल तो तामिळनाडूमध्ये होता. आता त्याला इकडे रस्त्यावर तर येऊ द्या. तामिळनाडूच काय, कुठेही भेटला तरी त्याची मस्ती उतरवू, असं गायकवाड म्हणाले.

कुणाल कामराच्या कृतीचं उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसह संजय राऊत यांनी समर्थन केलं. त्यावरही गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली. कुणाल कामरा हा त्यांचाच प्यादा आहे. ते जसे सांगतात, तेच तो बोलतो. जे आदित्य, संजय राऊत सांगतात, ते कामरा करतो, असा आरोपही गायकवाड यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulajapur News: तुळजाभवानी मंदिर परिसरात पुजाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी, VIDEO व्हायरल

Diya Cleaning Tips : दिवाळीपूर्वी जुन्या पणत्या अन् समई करा नव्यासारखी लख्ख, 'ही' घरगुती ट्रिक २ मिनिटांत करेल काम

Maharashtra News Live Update: जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून खा. उदयनराजे भोसले यांचा अर्ज मागे

Hand Exercises : हाताच्या बोटांमध्ये वारंवार सुन्नपणा जाणवतोय? 'हे' ६ व्यायाम वेळीच करा,नाहीतर....

Tiger Shroff : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात गुजरातमधून आणखी एकाला अटक, नेमकं कनेक्शन काय?

SCROLL FOR NEXT