CCTV footage shows Koyta gang attacking a shop in Pune’s Uttamnagar area after being denied cigarettes. Saam Tv
Video

Pune News: पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत! सिगारेट न दिल्याने दुकानावर कोयत्याने हल्ला|VIDEO

Pune Koyta Gang Crime Video Viral On Social Media: पुण्यात कोयता गँगची दहशत कायम असून, सिगारेट न दिल्याच्या कारणावरून तरुण टोळक्याने उत्तमनगरमधील दुकानावर कोयत्याने हल्ला केला.

Omkar Sonawane

पुणे येथे कोयता गँगची दहशत दिवसेंदिवस वाढताना दिसत असून पुणेकर हे भयभीत झाले आहे. शहरातील उत्तमनगर भागामध्ये सिगारेट न दिल्याच्या रागातून टोळक्याने थेट दुकान फोडले आहे,

मिळालेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार काल उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या परिसरात घडला. दुकानदार आणि हे सगळे तरुण एकमेकांच्या ओळखीचे आहेत. हे सगळे जणं अनेक वेळा या दुकानात जात होते. काल सुद्धा त्यांनी दुकानदाराकडून सिगरेट मागितली. मात्र, दुकानदाराने त्यांना सिगरेट देण्यास मनाई केली. याचा राग या सर्व तरुणांना आला. काहीच वेळात निघून गेलेले तरुण पुन्हा आले आणि दुकानदाराला शिवीगाळ केली आणि कोयते काढून दुकानावर वार केले. या हल्ल्यात दुकानाचे मोठे नुकसान झाले. ही सर्व घटना सी सी टिव्ही मध्ये कैद झाली आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News: स्तन वाढवण्यासाठी सर्जरी केली, काही तासांत १४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: सोलापूर दौऱ्यावर असणाऱ्या मंत्री भरत गोगावले यांचा ताफा शेतकऱ्यांनी रोखला

Mumbai Local Block: मध्य रेल्वेवर २ दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक; लोकलसह ट्रेनच्या वेळापत्रकात बदल, वाचा सविस्तर

Sakhi Gokhale: मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज...

Prabalgad Fort History: ट्रेकिंगसाठी खास! सह्याद्री पर्वतरांगेतील प्रबळगड किल्ल्याचे ऐतिहासिक वैशिष्ट्ये आणि इतिहास

SCROLL FOR NEXT