Local Body News Saam TV Marathi News
Video

झेडपीच्या प्रचारात साड्यांचे वाटप, भरारी पथकाने टेम्पो पकडला; 10 लाखांचा मुद्देमाल जप्त

Zilla Parishad election updates : कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करवीर तालुक्यात साड्यांचे वाटप करण्यासाठी आणलेला टेम्पो भरारी पथकाने पकडला.

Namdeo Kumbhar

Zilla Parishad election bribery attempt through sarees : कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आमिष दाखवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. करवीर तालुक्यात मतदारांना वाटण्यासाठी आणलेल्या साड्यांच्या टेम्पोवर भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे. करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द परिसरात भरारी पथकाने संशयास्पद टेम्पो अडवत तपासणी केली. या टेम्पोमध्ये मोठ्या प्रमाणावर साड्यांच्या पिशव्या आढळून आल्या. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करवीर तालुक्यातील महिला मतदारांना या साड्या वाटप केल्या जाणार होत्या. विशेष म्हणजे या साड्यांच्या पिशव्यांमध्ये स्थानिक उमेदवारांचे फोटो आणि हँडबिल्स ठेवण्यात आले होते. त्यामुळे ही साड्यांची वाटप प्रक्रिया निवडणूक आचार संहितेचे उल्लंघन असल्याचा संशय अधिक बळावला आहे.

भरारी पथकाने सुमारे सात ते दहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. घटनास्थळी भरारी पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. निवडणुकीदरम्यान आमिषाच्या माध्यमातून मतदारांवर प्रभाव टाकण्याचे प्रकार रोखण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. पुढील चौकशी सुरू असून संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

shocking : सरपंच सासू अन् मुख्याध्यापक सासऱ्याचा जाच असह्य झाला; पुण्याच्या दीप्तीने मृत्यूला कवटाळलं

Maharashtra Live News Update: धाराशिवमध्ये शिवसेनेच्या दोन गटात मोठा राडा

Quick Hairstyle on Saree: साडीवर झटपट करता येईल 'या' खास आणि ट्रेंडी हेअरस्टाईल्स

झेडपी निवडणुकीत मतदारांना आमिष; उमेदवारांचे फोटो असलेल्या साड्यांचा ट्रक भरारी पथकाने पकडला

Shocking: तरुणीने एक्स बॉयफ्रेंडच्या बायकोला दिलं HIV इंजेक्शन, लग्नाला नकार दिल्याचा राग डोक्यात गेला

SCROLL FOR NEXT