Kolhapur Saam TV
Video

Kolhapur : विद्यार्थिनींचा विनयभंग; संतप्त पालकांकडून शिक्षकाला बेदम चोप | VIDEO

School Incident : कोल्हापुरातील एका शाळेत शिक्षकाकडून विद्यार्थिनींचा विनयभंगाचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या पालकांनी शाळेतच शिक्षकाला चोप दिला असून, परिसरात प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झाल आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोल्हापुरातील सेनापती कापसे इथल्या एका शाळेत शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंगाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, संतप्त पालकांनी थेट शाळेत धाव घेत आरोपी शिक्षकाला चोप दिला आहे. या प्रकारामुळे शाळा परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरोधात POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.या प्रकारामुळे पालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी शाळेतील सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत संबंधित शिक्षकावर कठोरात कठोर कारवाईची मागणी केली आहे. शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दिवंगत पद्मश्री डॉ डी वाय पाटील यांना कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने मानवंदना

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

Vaidehi Parshurami: पैठणीत खुललं वैदेही परशुरामीचं सौंदर्य; सोज्वळ सौंदर्याने जिंकली चाहत्यांची मनं

Live Update : निवडणूक चिन्ह कुणाचे? राजकीय पक्षाचे की विधिमंडळपक्षाचे? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा प्रश्न

Baba Vanga Prediction: 5 ते 9 ऑगस्टदरम्यान 'या' 5 राशींवर होणार पैशांचा वर्षाव? पाहा तुमची रास आहे का

SCROLL FOR NEXT