kolhapur news  saam tv
Video

Kolhapur News: पावसाच्या सरी आल्या धावून अन् पूल गेला वाहून|VIDEO

Mouje Chauke Village Disconnected: राधानगरी परिसरात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून, या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. या मुसळधार पावसामुळे मौजे चौके गावातील छोटा पूल पूर्णतः वाहून गेला आहे.

Omkar Sonawane

कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यात पावसाचा जोर वाढत चालला आहे. या मुसळधार पावसामुळे मौजे चौके गावातील छोटा पूल पूर्णतः वाहून गेला असून गावाचा मुख्य रस्त्याशी संपर्क तुटला आहे.

या पुलाच्या माध्यमातून मौजे चौके गावाचा इतर भागांशी संपर्क होता. मात्र, पूल वाहून गेल्यामुळे सध्या गावात ये-जा करण्यासाठी वाहनांची वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे.

सध्या नागरिकांना मौजे चौके येथील लोखंडी पूल वापरण्याची मुभा आहे. हा पूल केवळ पायी चालण्यासाठीच उपलब्ध असून, वाहनांची वाहतूक यावरून करू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. प्रशासनाकडून लोखंडी पूल सध्या सुस्थितीत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

या परिस्थितीमुळे स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय होत असून, प्रशासनाकडून तातडीने पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Goodluck Cafe: 'गुडलक' कॅफेचे पुन्हा 'बॅड लक'; आता अंडा भूर्जीमध्ये आढळलं झुरळ

Manikrao Kokate: कृषीमंत्री पुन्हा बरळले, 'शासन भिकारी' मुख्यमंत्र्यांची कोकाटेंना तंबी

Maharashtra Politics : बटन दाबलं की दिल्ली हादरेल, भाजपमध्ये भूकंप येईल, मग दाबा बटन; गिरीश महाजन यांचं एकनाथ खडसेंना आव्हान

Second Hand Phone: सेंकड हँड मोबाईल घेताय? मग 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल पश्चाताप

गृहराज्यमंत्र्यांना डान्सबार भोवणार? अनिल परबांनी दिले कदमांविरोधात पुरावे

SCROLL FOR NEXT