Kolhapur Voting News Today Saam TV News
Video

Kolhapur News: मतदानाच्या रांगेत उभ्या असलेल्या वृद्ध मतदाराचा मृत्यू! हार्टअटॅकमुळे जागीच कोसळले

Saam TV News

कोल्हापूर : मतदानासाठी जाणाऱ्या मतदाराचा मृत्यू झाल्याची महाडमधील घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक घटना कोल्हापुरातून समोर आली आहे. कोल्हापूरमध्ये मतदानाच्या रांगेत उभ्या असलेल्या एका मतदाराचा मृत्यू झाला. हृदयविकाराचा झटका आल्यानं मतदाराचा मृत्यू झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. मतदानाच्या रांगेत उभ्या असलेल्या वृद्ध मतदाराचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जाते आहे. उत्तरेश्वर पेठेतील रमाबाई आंबेडकर शाळेत मतदान केंद्रावर ही घटना घडली. महादेव श्रीपती सुतार या 69 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. दरम्यान, नातेवाईकांसह, कार्यकर्त्यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले होते. उपचारापूर्वीच हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT