Hasan Mushrif SaamTv
Video

Kolhapur News : प्रचारासाठी गेलेल्या हसन मुश्रीफांचा ताफा शेतकऱ्यांनी अडवला; पाहा काय आहे प्रकरण

Hasan Mushrif : कागल तालुक्यातील एकोंडी गावात प्रचारासाठी गेलेल्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा ताफा संतप्त गावकऱ्यांकडून अडवण्यात आला आहे. यावेळी शेतकऱ्यांनी मुश्रीफांच्या गाडी समोर ठिय्या आंदोलन देखील केले.

Saam Tv

पालकमंत्री हसन मुश्रीफ प्रचारासाठी कागल तालुक्यातील एकोंडी गावात आलेले असताना शेतकऱ्यांनी अचानकपणे त्यांचा ताफा अडवून रस्त्यावरच ठिय्या मारल्याने गोंधळ उडाला. शक्तीपीठ महामार्गप्रश्नी आक्रमक होऊन हा ताफा अडवण्यात आला आहे. यामुळे मुश्रीफ यांना वाहनातून उतरून संबंधीत शेतकऱ्यांशी चर्चा करावी लागली.

शक्तीपीठ महामार्गप्रश्नी कागल तालुक्यातील शेतकऱ्यांनी मंत्री मुश्रीफ यांचा ताफा अडवला, रस्त्यावर ठिय्या मारत आचारसंहितेपूर्वी शक्तीपीठ महामार्ग रद्दचा निर्णय का घेतला नाही ? असा प्रश्न यावेळी शेतकऱ्यांनी विचारला आहे. शक्तिपीठ महामार्ग विरोधात गेल्या आठ महिन्यांपासून शेतकरी विविध मार्गाने आंदोलन करीत आहेत. पण सरकारकडून महामार्ग रद्दचा निर्णय झाला नाही. नेते केवळ तोंडी आश्वासने देवून बाधित शेतकऱ्यांची बोळवण करीत राहिले. आचारसंहिता लागण्यापूर्वीच शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याची लेखी अधिसूचना काढावी अशी मागणी शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने केली होती. पण सरकारने याकडे दूर्लक्ष केले. बाधीत शेतकऱ्यांत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे एकोंडी गावातील शेतकऱ्यांनी मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडवून नाराजी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT