Kishanchand Tanvani SaamTv
Video

VIDEO : उद्धवसेनेला मोठा धक्का, किशनचंद तनवाणी यांनी घेतली माघार; मोठं कारण आलं समोर

Chhatrapati sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी आज आपलं उमेदवारी तिकीट पक्षाला परत केलं आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

Saam Tv

उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार किशनचंद तनवाणी पक्षाला तिकीट परत केलं आहे. याबद्दल त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या पक्षाला छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघातून जोरदार धक्का बसला आहे.

छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघातून शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून प्रदीप जैस्वाल यांना तिकीट मिळाले आहे. तर उद्धवसेनेने या ठिकाणी किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी दिली होती. मात्र, आता तनवाणी यांनी सोमवारी आपली माघार जाहीर केली आहे. उद्धव सेनेच्या अंतर्गत गटबाजीमुळे तनवाणी यांनी हा निर्णय घेतल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. मात्र, यासंबंधी किशनचंद तनवाणी यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन खुलासा करत, 'मी कुणालाही पाठिंबा दिलेला नाही. मी स्वतः प्रदीप जैस्वाल यांच्याकडे गेलो होतो. त्यांना आम्ही यापूर्वीच्या निवडणुकीत मदत केली होती. त्याची आठवणही करून दिली. त्यांच्याकडून यावेळी मदतीची अपेक्षा होती. परंतु ते म्हणतात की, तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे, त्यांना बोला. शेवटी ही निवडणूक आहे. शहरावर 2014 सारखी परिस्थिती पुन्हा येऊ नये म्हणून हिंदुत्वासाठी मी हा निर्णय घेतला' असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT