सतीश भोसले उर्फ खोक्या  Saam Tv
Video

Satish Bhosale: 2 दिवसात खोक्याला अटक? नेमकं काय प्रकरण?

Criminal Khokya Latest News: बीडचा कुख्यात गुंड सतीश भोसले उर्फ खोक्याचे एकेक कारनामे आता समोर येत आहे. यावरूनच आज शिरूर तालुक्यात मोठे आंदोलन झाले. तसेच दोन दिवसात खोक्याच्या पोलीस मुसक्या आवळणार असल्याचे सांगितले जात आहे.

Omkar Sonawane

बीड येथील शिरूर तालुक्यातील गुन्हेगारी विश्वातील कुख्यात सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या अटकेसाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. पोलिसांच्या दोन विशेष तुकड्या त्याला अटक करण्यासाठी रवाना झाल्या असून, येत्या दोन दिवसांत त्याला अटक करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.दोन दिवसांपूर्वी खोक्याचा एक व्हिडीओ समोर आला, ज्यामध्ये तो ढाकणे कुटुंबातील सदस्यांना बॅटने अमानुषपणे मारहाण करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली असून, या घटनेच्या निषेधार्थ शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात आले. खोक्याने वनविभागाच्या जागेवर अनधिकृतरीत्या अतिक्रमण केल्याचेही उघडकीस आले आहे. जातेवाडी परिसरात त्याने बेकायदेशीर बांधकामे केली असून, त्याचे नातेवाईक त्या ठिकाणी वास्तव्यास आहेत. या प्रकरणीही त्याच्यावर कारवाईची मागणी होत आहे.खोक्याने यापूर्वीही अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. त्यामुळे त्याच्यावर अटकेची टांगती तलवार असून, येत्या दोन दिवसांत त्याला अटक केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Health: किडनी खराब होऊ नये म्हणून जीवनशैलीत आजच करा हे 7 महत्त्वाचे बदल

पावसाळ्यात खा गावरान स्टाईल दिंड्याची भाजी; घरी बनवण्याची रेसिपी एकदम सोपी

Koel Mallick Resign : ३ महिन्यांपूर्वीच शपथ, आता राज्यसभा खासदारकीचा राजीनामा; माजी मुख्यमंत्र्यांना जोरदार झटका

crime : भूलतज्ज्ञाची अपार्टमेंटमध्येच निर्घृण हत्या, ८ वर्षांचा मुलगाही गंभीर जखमी; डॉक्टर पत्नीच्या कृत्याने खळबळ

Eetha Controversy: इतिहासाशी छेडछाड सहन करणार नाही; श्रद्धा कपूरच्या 'ईठा'वर विठाबाई नारायणगावकरांच्या कुटुंबाचा आक्षेप

SCROLL FOR NEXT