Kashmir Resistance Front's Video saam tv
Video

Pahalgam Attack: घरं पाडल्याचा बदला घेणार; काश्मीर रेझिस्टंस फ्रंटच्या पोकळ धमक्या|VIDEO

Kashmir Resistance Front: भारताचे नंदनवन असलेल्या जम्मू काश्मीरच्या खोऱ्यात पर्यटकांवर हल्ला झाल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली होती. यानंतर भारतीय सेनेने मोठी कारवाई करत दहशतवाद्यांची घरे जमीनदोस्त केली होती.

Omkar Sonawane

जम्मू काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय जवानांनी मोठी कारवाई करत काश्मीरमध्ये राहत असणाऱ्या दहशतवाद्यांची घर सापडून उद्ध्वस्त केली होती. त्यानंतर काश्मीरमधील दहशतवादी संघटना काश्मीर रेझिस्टन्स फ्रंट (KRF) ने अहमद सालार नावाच्या दहशतवाद्याचा एक धमकीचा व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओमध्ये सालारने भारताला खुल आव्हान दिलं आहे.

सालारने व्हिडीओत दावा केला आहे की, सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त केल्याचा बदला घेतला जाईल. उद्ध्वस्त झालेल्या प्रत्येक घरासाठी, एक घर लक्ष्य केलं जाईल, अशी थेट धमकी त्याने दिली आहे. मात्र सुरक्षा दलांनी याकडे पोकळ आणि प्रचारकी प्रयत्न म्हणून पाहिले असून, दहशतवादाविरोधातील कारवाई आणखी तीव्र केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अहमद सालार हा आधीपासूनच सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आहे आणि लवकरच त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT