karnataka news  saam tv
Video

Karnataka Bank Robbery: देशातील सर्वात मोठा दरोडा; CCTV बंद, काळी जादू केली, 59 किलो सोनं, रोकड झटक्यात गायब | VIDEO

Black Magic and Bank Heist: कर्नाटक राज्यातील विजयपूर येथे एका बँकेत काळीजादू करून बँकेत दरोडा टाकून तब्बल 59 किलो सोन लुटल्याची घटना घडली आहे.

Omkar Sonawane

कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील मंगोली भागात असलेल्या कॅनरा बँकेच्या शाखेत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भीषण दरोडा पडला. या दरोड्यात चोरट्यांनी तब्बल 59 किलो सोनं आणि मोठ्या प्रमाणात रोकड लंपास केली असून, ही देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी सोन्याची चोरी असल्याचे मानले जात आहे.

दरोडेखोरांनी बँकेत घुसून सीसीटीव्ही यंत्रणा बंद केली, आणि संपूर्ण चोरी अत्यंत पूर्वनियोजित पद्धतीने केली. विशेष म्हणजे चोरी झाल्यानंतर चोरांनी काळ्याजादूचे साहित्य बँकेत ठेवले असून, त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

पोलिसांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या दरोड्यात 6 ते 8 जणांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या गुन्ह्यात बँकेतीलच कुणी कर्मचारी सहभागी होता का? याचाही पोलिसांकडून तपास सुरू आहे.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही, तसेच चोरांनी सोने नेमकं कसं पळवलं, हे देखील स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे संपूर्ण राज्यात तसेच देशभरात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

Crime : मैत्रिणीला भेटून घरी जात होती, नराधमांनी कारमध्ये ओढलं; १६ वर्षीय मुलीवर धावत्या कारमध्ये लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT