Midnight mob attack at the home of a Kargil war veteran in Pune’s Chandan Nagar sparks outrage after video of slurs and intimidation goes viral. Saam Tv
Video

Pune News: “तुम्ही रोहिंग्या आहात, इथून निघून जा”; कारगिल वीराच्या घरात टोळक्याचा हल्ला, पुण्यातील व्हिडिओ व्हायरल

Pune Viral Video Ex-Army: कारगिल युद्धात लढलेल्या माजी सैनिकाच्या घरात टोळक्याचा मध्यरात्री हल्ला झाला. "तुम्ही रोहिंग्या आहात" अशा शब्दांत अपमान केला.

Omkar Sonawane

कारगिल युद्धात लढलेल्या पुणे येथील एका माजी सैनिकाच्या घरात मध्यरात्री घुसून गोंधळ घालून आक्षेपार्ह शब्दांचा वापर करीत कुटुंबीयांवर दबाव निर्माण केला,अशी तक्रार माजी सैनिकाच्या भावाने चंदननगर पोलिस ठाण्यात केली आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री खराडीतील चंदननगर येथे घडली. याबाबत शमशाद अली शेख यांनी तक्रार दिली आहे. मात्र अजूनही पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही. याच शेख कुटुंबातील तक्रारदारांच्या आजोबा व चुलते भारतीय सैन्य दलामध्ये आपली सेवा बजावत निवृत्त झाले आहेत.

ते युद्धामध्ये सहभागी झाल्याचं शेख कुटुंबीय सांगत आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार एका टोळक्याने रात्री बारा वाजता घरात घुसून गोंधळ घालून,तुम्ही रोहिंग्या बांगलादेशी आहात,अशा आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला. तुम्ही इथून निघून जा, असा दबाव कुटुंबीयांवर आणला. घरातील एकाला झोपेतून उठून आधार कार्ड मागितले आणि शिवीगाळ केली असल्याचा आरोप शेख कुटुंबियांनी केला आहे. शेख कुटुंबीय गेले 50 वर्षापेक्षा जास्त काळ पुण्यात राहत असल्याचे पुरावे त्याच्याकडे आहेत. याबाबत चंदन नगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल असून अद्याप गुन्हा दाखल नाही. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivli : डोंबिवलीत डॉक्टर-वकिलांच्या घरांची आधी 'रेकी', मग धाडसी घरफोडी; दरोडेखोरांचा थरार सीसीटीव्हीत कैद

Tooth Pain Relief: दात दुखतोय? हे घरगुती वापरा, काही मिनिटांत मिळेल आराम

महाराष्ट्रातील भाजपच्या बड्या नेत्याला धमकी, २ कोटी दे नाहीतर...

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

Rahul Gandhi: राहुल गांधींना घरात घुसून गोळ्या घालू, भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून धमकी; VIDEO ने उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT