Kapil Sharma Saam TV
Video

Kapil Sharma : प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडातील रेस्टॉरंटवर गोळीबार | VIDEO

Kapil Sharma’s ‘Kap’s Cafe’ in Canada : कपिल शर्मा यांच्या कॅनडामधील ‘Kap’s Café’ रेस्टॉरंटवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारतातील प्रसिद्ध विनोदवीर कपिल शर्मा याच्या कॅनडामधील ‘Kap’s Cafe' रेस्टॉरंटवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील सरे (Surrey) शहरात रात्री उशिरा ही घटना घडली असून, अज्ञात व्यक्तींनी कॅफेमध्ये जवळपास ८ ते ९ गोळ्या झाडल्या असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, कॅफेमध्ये उपस्थित सर्वजण सुखरूप आहेत. पोलिसांनी घटनास्थळी तातडीने पोहोचून परिसर बंद केला असून, तपास सुरू करण्यात आला आहे.

या हल्ल्याची जबाबदारी बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) या खलिस्तानी संघटनेशी संबंधित दहशतवादी हरजीत सिंह लड्डी याने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टद्वारे घेतल्याचा दावा करण्यात येत आहे. कपिल शर्माने दिलेल्या कथित वक्तव्यामुळेच हल्ला केल्याचा आरोप त्याने केला आहे. स्थानिक पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास गतीने सुरू असून, हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Junnar Fort : जुन्नरला जात असाल तर 'हा' किल्ला पाहायला विसरू नका, इतिहास अन् निसर्गाचा अनोखा संगम अनुभवाल

'ब्लू' टी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर, कधी आणि कसं प्यावे जाणून घ्या

Idli Bhaji Recipe : उरलेल्या इडलीपासून बनवा कुरकुरीत भजी, घरच्यांना आवडेल ही हटके रेसिपी

Coronary artery disease: तुमचं ब्लड प्रेशर नेहमी नॉर्मल; तरीही हृदयातील ब्लॉकेजचा धोका कसा ओळखायचा? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Mumbai-Pune Train: पुणे-मुंबईकरांना मोठा दिलासा, १० दिवसांनतर रेल्वे रूळावर; कोणकोणत्या ट्रेन सुरू झाल्या?

SCROLL FOR NEXT