Damaged vehicles in Kalyan’s Kolshewadi after midnight stone-pelting by miscreants – Fear spreads among local residents Saam tv
Video

Kalyan News: कोळसेवाडी व विजयनगरमध्ये मध्यरात्री गाड्यांची तोडफोड; कल्याणमध्ये भीतीचं वातावरण|VIDEO

Vehicles Damaged By Drunken: कल्याणमधील कोळसेवाडी व विजयनगर परिसरात मध्यरात्री दारूच्या नशेत असलेल्या टवाळखोरांनी ७ ते ८ गाड्यांची तोडफोड केली. या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Omkar Sonawane

कल्याण येथील कोळसेवाडी आणि विजयनगर परिसरात मध्यरात्री मद्यधुंद टवाळखोरांनी दहशत माजवली. या उपद्रवींनी 7 ते 8 गाड्यांवर दगडफेक करत गाड्यांची तोडफोड केली. या घटनांमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले असून मोठ्या प्रमाणावर वाहनांचे नुकसान झाले आहे.

ही घटना घडली त्यावेळी अनेक नागरिक झोपेत असतानाच अचानक गाड्यांच्या काचा फुटण्याचा आवाज आला. काही नागरिकांनी बाहेर येऊन पाहिलं असता टोळकी दगडफेक करत गाड्यांवर तुफान हाणामारी करत असल्याचं निदर्शनास आलं.

घटनेनंतर कोळसेवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

सदर प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनाकडून वाढीव गस्त ठेवण्याची मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS TRANSFERS: राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती वाचा

ED Raids : माजी आयुक्त अनिलकुमार पवारांच्या घरी ईडीचा छापा; संपत्ती जाणून डोळे पांढरे होतील, वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update: ठाण्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमंती अशिमा मित्तल यांची नियुक्ती

Tariff : ट्रम्पचा धक्का, भारताला फटका? कोण-कोणत्या उद्योगांवर होणार परिणाम, जाणून घ्या

Ladki Bahin Yojana : राज्यातील ५० लाख बहिणी अपात्र ठरल्या; काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT