Kalyan West Hoarding Collapse Video Saam TV
Video

Kalyan Hoarding Collapse : कल्याणमधील होर्डिंग कोसळतानाचा थरारक VIDEO समोर, अनेक वाहने दबली

Kalyan West Hoarding Collapse Video : कल्याणच्या सहजाणंद चौकात शुक्रवारी सकाळच्या सुमारास भलंमोठं होर्डिंग कोसळलं. यामध्ये अनेक वाहने होर्डिंगखाली अटकली.

Satish Daud

काही दिवसांपूर्वी घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. याच घटनेची पुनरावृत्ती कल्याणमध्ये होता होता टळली. कल्याणच्या सहजाणंद चौकात शुक्रवारी सकाळच्या सुमारास भलंमोठं होर्डिंग कोसळलं. यामध्ये अनेक वाहने होर्डिंगखाली अटकली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, होर्डिंगखाली दबल्याने २ जण जखमी झाले.

जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. या घटनेत वाहनांचे मोठे नुकसान झालं आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाची टीम घटनास्थळी दाखल झाली असून बचाव कार्य सुरु आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहरात होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर आला होता. पण पुन्हा तशीच घटना कल्याणमध्ये घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेल्या सहजानंद चौकात होर्डिंग कोसळल्यामुळे लोकांचे हाल झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती मनपाची धडक कारवाई, 36.45 लाखांच्या थकबाकीसाठी दोन मालमत्ता सील

भाजपची राज्यसभेसाठी ११ नावांची घोषणा; २ बड्या केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, मोदी मंत्रिमंडळात फेरबदल होणार?

8th Pay Commission : कामाची बातमी! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या टेक होम पगारात मोठी वाढ? सरकार लागू करू शकतं हा फॉर्म्यूला

वजन वाढणारच नाही! सकाळी नाश्त्याला अरबट-चरबट खाण्यापेक्षा खा 'हे' 4 हाय-प्रोटीन पदार्थ; दिवसभर राहाल फिट

Paranoia symptoms: प्रत्येक गोष्टीत कटकारस्थान दिसतंय? तज्ज्ञांनी सांगितली पॅरानोइयाची धोकादायक लक्षणं आणि कारणं

SCROLL FOR NEXT