kalyan dombivali Saam Tv
Video

KDMC News: अग्निशमन विभागाकडून विद्यार्थ्यांना आगणीसुरक्षेचे धडे, VIDEO

Fire Safety Drills in Schools: कल्याण डोंबिवली महापालिकेने एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे, यामुळे सर्वत्र पालिका प्रशासनाचे कौतुक केले जात आहे.

Omkar Sonawane

शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून विविध उपाय योजना राबवल्या जात आहेत. शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून त्या पाठोपाठ शाळांमध्ये अचानक आग लागण्यासारखी दुर्घटना घडल्यास सुरक्षिततेसाठी विद्यार्थ्यांना अग्नि सुरक्षेचे धडे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत विद्यार्थ्यांना दिले जात आहे. आग लागल्यास कसा बचाव करावा? कोणत्या उपाययोजना कराव्यात? याबाबत कल्याण अग्निशामन दलाच्या वतीने कल्याण पश्चिमेतील शाळेत विद्यार्थ्यांना अग्निसुरक्षा प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी फायर इन्स्ट्रुमेंट म्हणजेच (Fire Extinguisher) चा वापर कसा करावा घाबरून न जाता कोणत्या उपाययोजना कराव्यात? कोणत्या परिस्थितीत कोणते यंत्र उपयोगात आणावे? याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना धूर भरलेल्या ठिकाणी कसा मार्ग काढायचा, आगीपासून स्वतःचा व इतरांचा जीव कसा वाचवायचा, तसेच प्राथमिक अग्निशमन यंत्रणांचा वापर कसा करायचा यावर प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे माहिती दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha vijay live updates : विजयी मेळावा, राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

Saturday Horoscope : मोठी स्वप्न पूर्ण होतील, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

SCROLL FOR NEXT