kalyan news saam tv
Video

Kalyan Rain: तासाभराच्या पावसाने कल्याण-डोंबिवली महापालिकेचा भोंगळ कारभार उघड|VIDEO

Kalyan-Dombivli Roads Flooded After Heavy Rain: राज्यभरात सध्या जोरदार पावसाने जोरदार थैमान घातले असून कल्याण डोंबिवलीमध्ये पावसामुळे महापालिकेचा भोंगळ कारभार समोर आला आहे.

Omkar Sonawane

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

कल्याण डोंबिवलीचा आजूबाजुच्या परिसरात गेल्या तासाभरापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. तासभर कोसळलेल्या या पावसाने कल्याण डोंबिवलीच्या नालेसफाईची मात्र चांगलीच पोलखोल केली. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील रस्ता हा पाण्याखाली गेलेला पाहायला मिळाला. रस्त्यावर जवळपास गुडघाभर पाणी साचल्याने वाहनचालकांचे मात्र चांगलीच तारांबळ उडाली होती. या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती काही वाहन देखील या पाण्यामुळे बंद पडली होती. दरवर्षी याच परिसरात पावसाळ्यात गुडघाभर पाणी साचते मात्र केडीएमसी कडून काहीच उपाययोजना होत नसल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT