Jyoti Malhotra Saam Tv
Video

Jyoti Malhotra: पाकची हेर ज्योती मल्होत्राचे चीनशी मैत्रीपूर्ण संबंध, मिळते VIP ट्रिटमेंट| VIDEO

Jyoti Malhotra Video: हेरगिरी प्रकरणात अटकेत असलेल्या ज्योती मल्होत्रासंदर्भात नवनवीन खुलासे समोर येत आहेत. ज्योतीचे फक्त पाकिस्तानशीच नाही तर चीनसोबत देखील मैत्रीपूर्ण संबंध असल्याची माहिती समोर आली आहे.

Priya More

युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानच्या हेरगिरी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या ज्योतीचे चीनसोबतचे मैत्रीपूर्ण संबंध समोर आले आहेत. तिच्या 'ट्रॅव्हल विथ जो' या युट्यूब चॅनेलवरून याची पुष्टी झाली आहे. ती १७ एप्रिल २०२४ ला एका महिन्याच्या दौऱ्यासाठी पाकिस्तानला गेली होती. १५ मे पर्यंत ती पाकिस्तानातच होती. भारतामध्ये परतल्यानंतर अवघ्या २५ दिवसानंतर १० जूनला ती चीनला गेली. ९ जुलैपर्यंत ज्योती चीनमध्येच होती. त्यानंतर १० जुलैला ती नेपाळमधील काठमांडूला पोहचली.

ज्योती मल्होत्रावर आपल्या देशातील संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. ज्योती हेरगिरी करत पाकिस्तानी अधिकाऱ्यांना आपल्या देशासंबंधी संवेदनशील माहिती पुरवत होती. ज्योती पाकिस्तान उच्चायुक्तालयात कार्यरत असलेल्या दानिश या अधिकाऱ्याच्या संपर्कात होती. जो तेथील गुप्तचर संस्थेच्या संपर्कात होता. हेरगिरी प्रकरणी ज्योती मल्होत्राला १७ मे रोजी अटक करण्यात आली. तिला न्यायालयाने ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मालेगावच्या भुईकोट किल्ल्याच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात

Maharashtra Politics: PM मोदींच्या आवाहनानंतर सरकारचा मोठा निर्णय, १२ आमदारांचा परदेश दौरा तातडीने रद्द

Jacqueline Fernandez ED Case: जॅकलिन फर्नांडिसला माफीची साक्षीदार बनवण्यास ईडीचा विरोध; कोर्टात अभिनेत्रीवर केले गंभीर आरोप

देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक मोठा निर्णय, पोलिसांसाठी ₹१७६८ कोटी मंजूर

Colon Cancer: कमी वयातच कोलन कॅन्सरचा धोका, ही ४ लक्षणं दुर्लक्षित करूच नका; वाचा डॉक्टरांचा सल्ला

SCROLL FOR NEXT