Priya More
हेरगिरी केल्याप्रकरणी हरियाणाच्या प्रसिद्ध युट्यूबर ज्योती मल्होत्राला पोलिसांनी अटक केली.
ज्योती मल्होत्रावर देशातील संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप आहे.
ज्योती मल्होत्रा ही हरियाणातील हिस्सार याठिकाणची रहिवासी आहे.
ज्योती मल्होत्रा प्रसिद्ध युट्यूबर असून तिचे ‘ट्रॅव्हल विथ जो’ हे युट्यूब चॅनेल आहे.
ज्योती मल्होत्राचे युट्यूबवर ३.७७ लाख सब्सक्राईबर्स आहेत. तिचा मोठा चाहतावर्ग आहे.
ज्योती मल्होत्राचे इन्स्टाग्रामवर १.३२ लाख आणि फेसबुकवर ३.२१ लाख फॉलोअर्स आहेत.
ज्योती मल्होत्रा देशभर भटकंती करत त्याठिकाणाची माहिती आपल्या युट्यूब चॅनेलवर देते.
ज्योतीने आपल्या चॅनेलवर पाकिस्तानशी संबंधित व्हिडिओ बनवले आहेत. ती ३ वेळा पाकिस्तानात देखील गेली आहे.
पाकिस्तानी सैनिक-पोलिसांशी तिची जवळीक आहे. पाकिस्तान दिनानिमित्त भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तालयात ती सेलिब्रेशनसाठी गेली होती.