Jitendra Awhad SaamTv
Video

Jitendra Awhad : वाल्मिक खडा तो सरकारसे बडा; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप | Video

Walmik Karad News Update : खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा सध्या कोठडीत आहे. मात्र रात्री कराडची मैफिल रंगते असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमधून गंभीर आरोप केले आहेत.

Saam Tv

बीड सरपंच संतोष देशमुख हत्याकांडमधील खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा सध्या कोठडीत आहे. त्याची चौकशी सुरू आहे. मात्र असं असतानाही कराड याच्या दिमतीत ७ पोलीस ठेवण्यात आले आहे. बीडमधील कराडच्या गॅंगमधले छोटे मोठे गुन्हेगार हे मुद्दाम स्वत:वर एखादा गुन्हा ओढवून घेत जेलमध्ये पोहोचत आहे. त्यानंतर रात्री जेलमध्ये मैफिल रंगते, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

बीडच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा मास्टर माईंड असल्याचा संशय असल्याने त्याला पोलिसांनी तब्यात घेतलं आहे. गेल्या काही दिवसांपासून तो कोठडीत असून त्याच्यावर मकोका देखील लावण्यात आलेला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटीकडून करण्यात येत आहे. पण आता वाल्मिक कराडच्या या जेल वारीवर जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप केलेले आहेत. त्याबद्दल त्यांनी एक ट्विट केलेलं आहे. या ट्विटमध्ये आव्हाड यांनी म्हटलं आहे की, हॉस्पिटलमधून बाहेर काढलेल्या वाल्मिक कराड याला आता बीड जेलमध्ये ठेवलं आहे. जेलमध्ये त्याच्या दिमतीत ७ हवालदार तैनात ठेवण्यात आलेले आहेत. बीडमधील त्याच्या गँगमधील छोटे-मोठे गुन्हेगार मुद्दामहून स्वतःवर एखादा गुन्हा ओढावून घेतात. अन् या गुन्हेगारांची रवानगी बीडपोलिसात होते. मग ते आपोआप वाल्मिक कराडच्या जवळ पोहोचतात आणि मग रात्री मस्त मैफिल रंगत असते. एकंदरीत तो कारागृहात आहे, अशी भावनाच त्याच्या मनात निर्माण होऊ द्यायची नाही, असा निर्णय शासन दरबारी झालेला दिसत आहे, असं आव्हाड यांनी ट्विटमध्ये लिहिलेलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: लंडनमध्ये युवराज खोपडे यांचा कुस्तीचा डंका

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

किचनमध्ये रोज होणाऱ्या ७ चुका, ज्या प्रत्येक महिलेने आवर्जून टाळाव्यात; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT