Jitendra Ahwad Saam TV
Video

Vidhimandal Rada : मी न सापडल्याने नितीनला मारलं, खरं मलाच मारणार होते: Jitendra Awhad | पाहा VIDEO

Jitendra Awhad : नितीन देशमुख यांच्यावर झालेला हल्ला हा अपघाती नव्हता, तर मूळ उद्दिष्ट मी होतो, असं जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विधान भवन परिसरात निर्माण झालेल्या गोंधळानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी साम टीव्हीशी थेट संवाद साधत आपली भूमिका मांडली. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांशी झालेल्या वादानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर आव्हाड यांनी परखड प्रतिक्रिया दिली आहे. "मी न सापडल्यामुळेच नितीनला मारलं, खरं तर टार्गेट मीच होतो."

या प्रकारानंतर झालेल्या गोंधळामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भडका उडाला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट शब्दांत आरोप केला की, गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांचा उद्देश त्यांच्यावर हल्ला करण्याचा होता. पण ते त्या वेळी थेट उपस्थित नसल्यामुळे त्यांच्या शेजारी उभा असलेल्या नितीन देशमुख यांच्यावर हल्ला झाला.आव्हाड म्हणाले, "ही योजना पूर्वनियोजित होती. माझ्यावर हात उचलण्याचा कट रचला गेला होता. मी त्या वेळी जर तिथे थांबलेलो असतो, तर निशाणा मीच होतो."या घटनेनंतर विधीमंडळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT