Jaykumar Gore Saam Tv
Video

Jaykumar Gore: 'मी आधुनिक अभिमन्यू, फडणवीसांचा पठ्ठा', जयकुमार गोरे यांनी रामराजे यांना डिवचलं

Jaykumar Gore On Ramraje Nimbalkar: मंत्री जयकुमार गोरे यांनी जाहीर सभेमध्ये विरोधक रामराजे नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा डिवचले आहे. 'मी आधुनिक अभिमन्यू', असल्याचे म्हणत त्यांनी रामराजेंना डिवचलं. त्यांच्या वक्तव्याची चर्चा होत आहे.

Priya More

'मला किती ही चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न केला तरी आता अडकणार नाही. मी आधुनिक अभिमन्यू आहे. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पठ्ठा देखील आहे.' असं विधान ग्रामविकास मंत्री विजयकुमार गोरे यांनी केले आहे. त्यांनी विरोधक रामराजे नाईक निंबाळकर यांना या निमित्ताने पुन्हा एकदा डिवचले आहे. सांगोला येथे सर्वपक्षीय सत्कार समारंभात जयकुमार गोरे बोलत होते.

'सांगोल्याचे राजकारण सुसंस्कृत आहे. परंतु आमच्या जिल्ह्यात एकमेकांना जेलमध्ये घालण्याची स्पर्धा सुरू आहे. राजकारण हा सूड बुध्दीचा खेळ झालाय. सांगोला तालुका याला अपवाद आहे. या तालुक्याला विचार आहे. ज्या विहीरीत पाणी नाही त्या विहीरित उडी मारू नका. देवा भाऊच्या विहिरीत पाणी आहे. तिकडेच उडी मारा.' असं आवाहन करत शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख यांना भाजप सोबत येण्याची खुली ऑफर जयकुमार गोरे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: बाजारात ५५० रूपयांचं कॉईन? १०० आणि ७५ रुपयांचंही कॉईन येणार?

Accident: मुंबईत अपघाताचा थरार! हायवेवर रेस लावणं पडलं महागात, महागड्या पोर्शे कारचा चुराडा; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : पंचायत समिती सभापतिपदासाठी आज आरक्षण सोडत

Besan Ladoo Recipe : ना कडक ना जास्त चिकट; 'असे' बनवा परफेक्ट खमंग बेसनाचे लाडू

Arbaaz Khan Daughter Name : खान कुटुंबात आली प्रिंसेस, अरबाज-शूराने ठेवलं लेकीचं खास नाव

SCROLL FOR NEXT