Ajit Pawar plane crash investigation details : दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबतचा प्राथमिक तपास अहवाल समोर आला आहे. जय पवार यांनी या अहवालावर असमाधान व्यक्त केले आहे. हा अहवाल अतिशय वरवरचा आणि अपूर्ण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एआयबीने (AIB) तयार केलेला प्राथमिक अहवाल वाचला आहे. हा अहवाल वाचल्यानंतर अत्यंत खेद आणि वेदना झाल्या आहेत. हा अहवाल पूर्णपणे आणि सखोल अभ्यास करून तयार करण्यात आलेला नाही. केवळ औपचारिक माहिती देऊन हा विषय संपवू नये. महाराष्ट्रातील जनतेला आणि ज्या कुटुंबांनी या अपघातात आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांना सत्य आणि पारदर्शक उत्तर मिळालेच पाहिजे, असे जय पवार म्हणाले.
जय पवार नेमकं काय म्हणालेत?
एएआयबीने तपासलेला प्राथमिक अहवाल मी वाचला. हा अहवाल पूर्णपणे आणि सखोलपणे तयार न केल्याचे पाहून मला अत्यंत खेद आणि वेदना होत आहेत. महाराष्ट्रातील जनतेला तसेच या अपघातात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या सर्व कुटुंबियांना केवळ औपचारिक माहिती नव्हे, तर सत्य, पारदर्शक आणि सर्वंकष उत्तरे मिळालीच पाहिजेत. DGCA ने ज्या मुद्द्यावर VSR Ventures ची काही विमाने ग्राउंड केली आहेत, त्याच मुद्द्यावर इतर विमानांमध्येही त्रुटी असण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही.
जर सुरक्षेसंदर्भातील नियम आणि प्रक्रियेमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या असतील, तर केवळ काही विमानांपुरती कारवाई न करता संपूर्ण VSR फ्लोटबाबत कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे.प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, आवश्यक असल्यास VSR च्या संपूर्ण विमान ताफ्याचे पूर्णपणे संचालन बंद करण्याचाही DGCA ने विचार करायला हवा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.