Heated argument breaks out during Congress review meeting in Jalna. saam tv
Video

काँग्रेस पक्षाच्या बैठकीत राडा; महिला पदाधिकारी आणि जिल्हा अध्यक्षामध्ये बाचाबाची

Congress Meeting Clash : जालन्यात काँग्रेस पक्षाच्या संघटन सृजन अभियानाच्या बैठकीमध्ये आज मोठा राडा झाला. महिला पदाधिकारी नंदा पवार आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.

Bharat Jadhav

राज्यातील पक्ष संघटना मजबूत करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्यावतीने जिल्हा स्तरावर आणि लोकसभा मतदारसंघात आढावा बैठक घेतली जात आहे. यात कार्यकर्त्यांशी संवाद साधला जातोय. जालन्यातही आढावा बैठक घेण्यात आली मात्र काँग्रेस पक्षातील नेता आणि कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. महिला पदाधिकारी आणि काँग्रेस जिल्हाध्यक्षांमध्ये वाद झाला. पक्षातून का हाकलपट्टी करण्यात आली याचा जाब महिला पदाधिकारी विचारत होती. त्यावेळी महिलेने अर्वाच्य भाषा वापरली. काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांना महिला पदाधिकारीने शिवीगाळ केली. त्यामुळे संतापलेल्या देशमुख यांनी चक्क पायातील बूट काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्यांना रोखलं. महिला पदाधिकारीचे नाव नंदा पवार असे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 Weekend Ka Vaar: 'तू दाखवून दिलं की तू कोणाशीचं लॉयल नाही'; वीकेंड का वारमध्ये स्काउटवर सलमान खान भडकला

Bank Robbery : SBI बँकेत सशस्त्र दरोडा! बडतर्फ PSI निघाला मास्टरमाईंड; जेलमधून रचला कट

Pune : पुण्याजवळचं 'हे' ठिकाण दिसतं चक्क गळ्यातल्या नेकलेससारखं, निसर्गाचा चमत्कार म्हणावा असंच दृश्य

Maharashtra News Live Update: गोकुळ विजयानंतर सतेज पाटील यांना हर्षवर्धन सपकाळ यांनी उचलून घेत केलं अभिनंदन

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, ५ बड्या नेत्यांना फोडलं; समर्थकांसह हाती घेतलं 'धनुष्यबाण'

SCROLL FOR NEXT