Jalgaon News SaamTv
Video

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात अवकाळी पाऊस, शेती पिकाचे नुकसान; आजही येलो अलर्ट जारी

Heavy Rainfall In Jalgaon : रावेर व यावल तालुक्यातील काही भागात गारपिटीसह पाऊस झाला आहे. त्यामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने काढणीला आलेली पिकं आता वाया गेली असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे.

Saam Tv

जळगाव जिल्ह्यात ऐन हिवाळ्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील रावेर, भुसावळ, यावल व जळगाव तालुक्यातील काही भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे हरभरा, तूर व फरदड कापसाचे नुकसान झाले आहे. तर कोरडवाहू जमिनीवरील पिकांना मात्र फायदा झाला आहे.

हवामान विभागाकडून जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यात काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे किमान तापमानात वाढ होऊन, थंडीही कमी झाली होती. जळगाव जिल्ह्यातील रावेर व यावल तालुक्यातील काही भागात गारपिटीसह पाऊस सुरू झाला. काही भागांत गारपिटीसह अवकाळी पाऊस हजेरी लावली. यावल शहर व तालुक्यातील बामणोद, आमोदा, न्हावी या भागांत गारपिटीसह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे हरभरा, तूर व फरदड कापसाचे नुकसान झाल्याने शेतकरी आता चिंतातुर झाले आहेत. पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

विरोधकांनंतर ज्ञानेश कुमारांविरोधात भाजपचे माजी मंत्रीही मैदानात; चोक्कलिंगम यांच्या पत्रानंतर कुमार आणखी अडचणीत

Mumbai News : मुंबई महापालिकेत खळबळ! दोन बड्या अधिकाऱ्यांचा मोठा गेम उघड, लाचखोरीचा गुन्हा

Pradeep Purnekar: ठाण्यात ठाकरेसेनेच्या विभाग प्रमुखावर कार्यालयातच गोळीबार; हत्येचा थरारक घटनाक्रम

SCROLL FOR NEXT