War ship on sea india-pakistan  saam tv
Video

India vs Pakistan : आता लावा जोर! पाकिस्तानला आडवाच करणार, समुद्रात ५ युद्धनौका, VIDEO

Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं केलेल्या कारवाईनंही पाकिस्तान सुधारण्याचं नाव घेत नाही. पोकळ धमक्या देणाऱ्या पाकिस्तानविरोधात आता भारतानं दंड थोपटले आहेत. समुद्रात पाच युद्धनौका सज्ज आहेत.

Nandkumar Joshi

'सुंभ जळाला तरी पीळ जात नाही', अशी अवस्था झालेला पाकिस्तान भारताला पोकळ धमक्या देत सुटला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानविरुद्ध भारतानं आक्रमक पवित्रा घेतला आहे. वॉटर स्ट्राइकनंतर पाकिस्तान्यांना भारत छोडोचा आदेश देण्यात आलाय. दुबळ्या पाकिस्तानसाठी अत्यंत गरजेचा असलेल्या सिंधु पाणी कराराला स्थगिती दिल्यानंतर तर, त्यांचा जळफळाट झालाय. त्यातून भारताला धमक्या देत फुसका बार सोडला जात आहे.

खायचे वांधे झालेल्या पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी भारतानं जोरदार तयारी केली आहे. दोन हात करायला कधीही तयार आहोत, असाच काहीसा पवित्रा असलेल्या भारतीय नौदलाने कंबर कसली आहे. भारतीय नौदलाने एक फोटो ट्विट केला आहे. त्या फोटोत आपण पाहू शकतो की पाच युद्ध नौका समुद्रात तैनात झाल्या आहेत. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नौदलाकडून हे ट्विट केल्यानंतर भारत आता पाकिस्तानच्या विरोधात मोठं पाऊल उचलाणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohini Khadse: कोण आहे रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

SCROLL FOR NEXT