Terrorists Killed saam tv
Video

India Pakistan Tension: पुलवामामध्ये पुन्हा चकमक, आर्मीच्या हिटलिस्टवर 14 दहशतवादी, काय घडलं?|VIDEO

Operation Sindoor: जम्मू काश्मीरमध्ये अजूनही भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. आज रात्रीच्या सुमारास दोन दहशतवाद्यांना कंठस्नान करण्यात आले आहे.

Omkar Sonawane

भारताचे स्वर्ग म्हणून ओळख असणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत शंभर दहशतवाद्यांचा खात्मा केला. यानंतर अजूनही भारतीय सैन्य अलर्ट मोडवर असून दहशतवाद्यांच्या प्रत्येक हालचालीवर काटेकोरपणे लक्ष ठेवून आहे. आज पुलवामामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला असून यामध्ये दोन दहशतवाद्यांना यमसदनी धाडले आहे.

पुलवामा जिल्ह्यात त्राल येथील नादिर गावात सुरक्षा दलांनी चारही बाजूने घेरले आणि सर्च ऑपरेशन सुरू केले. रात्री उशिरा केलेल्या या मोहीममध्ये नादिर गावातील दहशतवादी आणि सैन्यात गोळीबार सुरू झाला.

यानंतर पुलवामाच्या त्रालमध्ये तीन दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. त्रालमधील जंगलातं 2 ते 3 दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवलं. या चकमकीत तीनही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वीच किश्तवाडमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या टॉप कमांडरसह ३ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Tea Water for Hair: केसगळती कमी करुन केस होतील शायनी आणि घनदाट; केसांना लावा चहा पत्तीचं पाणी

World Heart Day: सतत गुडघेदुखीचा त्रास होतोय? हृदयासाठीही ठरू शकतो इशारा, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

Traffic E-Challan : ट्रॅफिक ई-चलन थकीत आहे? रस्त्यावरच गाडी जप्त होणार! जाणून घ्या सुप्रीम कोर्टाचे 'हे' १० कडक नियम

SCROLL FOR NEXT