Turkey saam tv
Video

India Punishes Turkey: पाकला मदत करणाऱ्या तुर्कीला भारताचा दणका, सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेसची सुरक्षा मंजुरी तात्काळ रद्द |VIDEO

Big Blow to Turkey: भारत आणि पाकिस्तान युद्ध संघर्षाच्या वेळेस पाकिस्तानला पाठिंबा देण्यात तुर्की आणि अजरबैजनला चांगलाच भोवले आहे.

Omkar Sonawane

भारत आणि पाकिस्तान युद्ध संघर्षाच्या वेळेस पाकिस्तानला पाठिंबा देण्यात तुर्की आणि अजरबैजनला चांगलाच भोवले आहे. या दोन्ही देशात जाणाऱ्या 60% भारतीय पर्यटकांनी आपले बुकिंग रद्द केले होते. त्यानंतर मुंबई, दिल्लीसारख्या मोठ्या शहरामध्ये तुर्की आणि अजरबैजनमधून येणाऱ्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा आवाहन केलं जात होतं. सोशल मीडियावर देखील हाच ट्रेंड सध्या सुरू असल्याचा पाहायला मिळत आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती ज्यावेळेस निर्माण झाली होती. तुर्की आणि अजरबैजनवर भारतीय पर्यटनांकडून बहिष्कार टाकण्यात आला होता.

तुर्की आणि अजरबैजन या दोन्ही देशांनी पाकिस्तानला दिलेल्या पाठिंबामुळे भारतीय नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली होती. यामुळे भारतीय पर्यटकांनी या दोन्ही देशांमध्ये होणारे पर्यटन टाळण्यास सुरुवात देखील केली होती. आता यानंतर पुन्हा भारताने तुर्कीला मोठा दणका दिला आहे. सेलेबी या कंपनीची एअरपोर्टला असणारी सुरक्षा भारताने संपूर्ण काढून टाकली आहे. यामुळे तुर्की देशाला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही कंपनी एअरपोर्टवर ग्राउंड वर 70 टक्के ऑपरेशन हाताळते. त्यात प्रवासीसेवा, लोड कंट्रोल सारख्या अनेक सेवांचा समावेश आहे. या निर्णयामुळे तुर्कीला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानंतर भारताने तुर्कीची कोंडी केल्याचे पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Police : धुळ्यात एमडी ड्रग्सचा साठा हस्तगत; धुळे पोलिसांकडून कारवाई, दोघे ताब्यात

Bareli Protest : बरेलीत नमाजावेळी मोठा गोंधळ, शेकडो आंदोलक रत्यावर उतरले; पोलिसांचा लाठीचार्ज

Vastu Tips Of Lighting Diya: घरात या दिशेला ठेवू नये पेटता दिवा, ओढवेल मोठं संकट

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

SCROLL FOR NEXT