देशातील निवडणूक प्रक्रियेवरून राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत इंडिया आघाडीने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत इंडिया आघाडीकडून भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या मोर्चाला सुरुवात झाली आहे. विरोधी पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. दिल्लीतील मिंटो रोड जंक्शन येथून या मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा रामलीला मैदानापर्यंत जाणार आहे. तेथे पोहोचल्यानंतर इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून संबोधित केले जाणार आहे.
निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाविरोधात आपली नाराजी व्यक्त करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. दरम्यान, महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी सुरक्षेची विशेष खबरदारी घेतली आहे. मोर्चाच्या मार्गावर ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला असून, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत. या आंदोलनामुळे दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.