Dharavi News SaamTv
Video

VIDEO : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत धारावीकरांसाठी महत्वाचा निर्णय !

Dharavi News : अपात्र झोपडीधारकांना भाडेतत्वावर घरं देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला.

Saam Tv

धारावीमधील अपात्र झोपडीधारकांना भाडेतत्वावर घरं देण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय सोमवारी घेण्यात आला आहे.

धारावीमधील अपात्र झोपडीधारक नागरिकांना भाडेतत्वावर घरं देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून याची जबाबदारी धारावी पुनर्वसन प्रकल्पावर असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. राज्यासाठी 38 महत्वाचे निर्णय यावेळी घेण्यात आले आहेत. यात धारावीतील झोपडपट्टीमधील नागरिकांसाठी देखील भाडेतत्वावर घरं देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अपात्र झोपडीधारकांना ही भाडेतत्वावरील घरं देण्यात येणार आहे. याची जबाबदारी धारावी पुनर्वसन प्रकल्पावर सोपवण्यात आली आहे. याशिवाय या बैठकीत मराठा आरक्षणाशी संबंधित माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीची दुसरा व तिसरा अहवाल स्वीकारण्यात आला. याशिवाय राज्यातील होमगार्ड व कोतवालांच्या मानधनात भरीव वाढ करण्यासह ग्राम रोजगार सेवकांना दरमहा 8 हजार मानधन देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाचा राज्यातील हजारो होमगार्ड कोतवाल व रोजगार सेवकांना लाभ होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT