एका मशिदीचा अवैध भाग पाडण्याच्या मुद्यावरून मुंबईच्या धारावीत मोठा तणाव निर्माण झाला आहे. या ठिकाणी संतप्त जमावाने मुंबई महापालिकेच्या गाडीवर दगडफेक केली असून, रस्त्यावरच ठिय्या मांडला आहे. यामुळे खबरदारी म्हणून येथे मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
धारावी परिसरात एक मशीद आहे. या मशिदीची काही भाग अवैध असल्याचा दावा मुंबई महापालिका प्रशासनाने केला आहे. हा अवैध भाग पाडण्यासाठी मुंबई महापालिकेचे काही कर्मचारी आज तिथे गेले होते. यामुळे येथे मोठा तणाव निर्माण झाला. महापालिकेच्या या कारवाईविरोधात स्थानिक नागरीक रस्त्यावर उतरले. त्यांनी या कारवाईला विरोध दर्शवला. यावेळी त्यांची अधिकाऱ्यांशी बाचाबाची झाली. अखेर संतप्त जमावाने दगडफेक करत बीएमसीच्या गाडीची तोडफोड केली. त्यानंतर त्यांनी रस्त्यात बसून ठिय्या आंदोलन सुरू केले. या कारवाईमुळे संताप व्यक्त केला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.