भाजपात आल्यानं शांत झोप लागते म्हणणारे भाजपचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटल आणि एका विधानामुळे वादात सापडले आहेत. इचलकरंजी हे पाकव्याप्त काश्मीर आहे असं वक्तव्य त्यांनी केलंय. त्यामुऴे विरोधकांनी मुंबई, सिल्लोड असा सगळाच इतिहास काढत त्यांचावर निशाणा साधला आहे. भाजप नेते हर्षवर्धन पाटीलांच्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण झालाय. त्यांनी इचलकरंजीचा उल्लेख थेट पाक व्याप्त काश्मीर असा केला आहे. सांगलीच्या वाळवा इथे क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांचा जयंती समारंभ होता. त्यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यानं आता वाद तर निर्माण झालाच...मात्र विरोधकांनी यापूर्वीच्या त्यांच्या नेत्याचा दाखला देत जोरदार निशाणा साधलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.