Nashik News saam tv
Video

Nashik Breaking : नाकाबंदीदरम्यान नाशिकमध्ये सापडली 31 लाखांची रोकड!, पैशांशी राजकीय संबंध असल्याची शक्यता

Cash Seized In Nashik : नाशिक पोलीसांना तपासादरम्यान 31 लाख रुपयांची रोकड मिळाली आहे. या रकमेचा काही राजकीय संबंध आहे का? याबद्दल सध्या तपास सुरू आहे.

Saam Tv

नाशिकमध्ये नाशिक पोलीसांना तपासादरम्यान 31 लाख रुपयांची रोकड सापडली आहे. नाशिकच्या सातपूर परिसरातील नाकाबंदी दरम्यान 20 लाख 50 हजार रुपयांची रोकड सापडली आहे. तर उपनगराच्या झोपडपट्टीत घराच्या झडती दरम्यान 11 लाख रुपये सापडले आहेत. या रकमेचा काही राजकीय संबंध आहे का, असा तपास पोलीस करत आहेत.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये 31 लाख रुपयांची रोकड सापडल्याने खळबळ उडाली आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू आहे. त्यातच अनेक भागात मोठ्या प्रमाणात रक्कम मिळून येत आहे. त्यामुळे विधानसभेत पैशांचा पाऊस होत असल्याचं सध्या दिसत आहे. गुरुवारी नाशिकच्या सातपूर परिसरातील नाकाबंदी दरम्यान पोलीसांना 20 लाख 50 हजार रुपयांची रोकड मिळून आली आहे. तर नाशिक उपनगराच्या एका झोपडपट्टीत घराची झडती घेत असताना 11 लाख रुपये रोख मिळून आली आहे. त्यामुळे आता नाशिक परिसरात खळबळ उडाली आहे. या रकमेचा काही राजकीय संबंध आहे का? याबद्दल सध्या चौकशी सुरू आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लव जिहाद कायदा झालाच पाहिजे - आमदार संग्राम जगताप

अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण: १० वर्षानंतरही न्याय नाही, कुटुंबांनी केली इच्छामरणाची मागणी

सौरऊर्जा प्रकल्पात १२२.५८ कोटींचा मोठा फसवणूक प्रकार; 'या' चार कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल

Holi 2026 : होळी खेळण्यापूर्वी 'हे' १ काम करा, रंगाचा डागही पडणार नाही अन् चेहरा हिऱ्यासारखा चमकेल

Salim Khan: सलीम खान यांना भेटायला हॉस्पिटलमध्ये गेले अमिताभ बच्चन अन् जावेद अख्तर; व्हायरल फोटोचं नेमकं सत्य काय?

SCROLL FOR NEXT